एलओसीवर पुन्हा गोळीबार, जवान जखमी

येथील अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) आज पुन्हा गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात लष्कराचा एक जवान जखमी झाला. संबंधित जवान बटाल भागात गस्त घालत असताना सीमेपलीकडून गोळीबार झाला. जखमी जवानाला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या गोळीबारात पाकिस्तानी लष्कराचा हात आहे की दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला, याचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून या भागात सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत.