पंजाबमध्ये 271 अवैध ट्रॅव्हल एजंटची नोंदणी रद्द

पंजाब सरकारने 271 अवैध ट्रॅव्हल एजंटची नोंदणी रद्द केली आहे. अमेरिकन सरकारने अवैध हिंदुस्थानींना अमेरिकेतून बाहेर काढल्यानंतर पंजाब सरकारने ही कारवाई केली आहे. अमृतसर पोलिसांनी याआधी कारवाई करत 40 ट्रॅव्हल एजंटचे परवाने रद्द केले होते. अमेरिकेतून आतापर्यंत तीन विमानांनी एकूण 335 हिंदुस्थानी नागरिकांना परत पाठवले आहे. पहिल्या फ्लाईटमध्ये 104 प्रवासी होती. ज्यात 33 हरियाणा, 33 गुजराती आणि 30 पंजाबी लोकांचा समावेश होता.