
‘आला रे आला कोंबडीचोर आला’ अशा जोरदार घोषणा देत भाजपचे मंत्री नितेश राणेंना शिवसैनिकांनी कोंबडीचे चित्र दाखवत विरोध केला, तर सात रस्ता परिसरात स्वागतासाठी बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेला डिजिटल फलक महापालिकेने कारवाई करत काढून टाकले.
नितेश राणे हे आज सोलापूर व अक्कलकोट दौऱयावर आले होते. राणेंचा ताफा विमानतळाबाहेर पडताच शिवसेनेचे उपशहरप्रमुख संतोष घोडके व शिवसैनिकांनी हातात कोंबडय़ाचे चित्र असलेले फलक घेऊन ‘आला रे आला कोंडीचोर आला’च्या घोषणा देत राणेंचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केल्यास राणेंच्या गळ्यात कोंबडी बांधू आणि सोलापुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा उपशहरप्रमुख संतोष घोडके यांनी यावेळी दिला.