महाराष्ट्र राज्य लॉटरीचा वर्धापन दिन उत्साहात, ‘दिव्यपथ’ विशेषांकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

महाराष्ट्र राज्य लॉटरी 56 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. ग्राहक, विक्रेते, वितरक, हितचिंतक आणि सरकार यांचा आर्थिक विकास त्यातून व्हावा त्याची पूर्तता विक्रेत्यांनी करावी. यापुढे लॉटरीची विक्रमी विक्री होण्यासाठी साऱ्यांनी प्राधान्याने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्याच्या लॉटरी आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य लॉटरीचा 56 वा वर्धापन दिन सोहळा नुकताच मंत्रालयात लॉटरी आयुक्तांच्या दालनात साजरा करण्यात आला. यावेळी लॉटरी विक्रेत्या संघटनेचे ज्येष्ठ नेते विलास सातार्डेकर यांनी आयुक्तांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या ‘दिव्यपथ’ या सुमित सातार्डेकर संपादित विशेषांकाचेही प्रकाशन आयुक्तांच्या हस्ते करणार आले.

राज्य लॉटरीच्या बंदीचे संकट जरी आज टळले असले तरीही विक्रेत्यांनी आता सर्वाधिक विक्रीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत. त्यामुळे अर्थचक्र सुरळीत सुरू राहील, असे सांगून आयुक्तांनी लॉटरी विव्रेत्यांचे आभार मानले. लॉटरी उपसंचालक आनंद जोशी यांचे आभार यावेळी वितरक, विक्रेते स्नेहल शाह यांनी मानले.

यावेळी लॉटरी संघटनेचे सरचिटणीस राजेश बोरकर, उपाध्यक्ष कमलेश विश्वकर्मा,लॉटरी विभागाच्या कक्ष अधिकारी शीला यादव, कक्ष अधिकारी रोहित सोनवणे, लेखा अधिकारी संदेश ओहाळ उपस्थित होते.