हेच ते क्रूरकर्मा दहशतवादी! पर्यटकांना ठार मारणाऱ्या संशयित दहशतवाद्यांचा फोटो प्रसिद्ध

Photo of terrorists who killed 26 Pahalgam tourists released

जम्मू आणि कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामागील संशयित दहशतवाद्यांचे फोटो तसेच रेखाचित्रे सुरक्षा यंत्रणांनी प्रसिद्ध केली आहेत. या हल्ल्यात 26 पर्यटक मृत्युमुखी पडले आणि अनेक जण जखमी झाले. या तिन्ही दहशतवाद्यांची ओळख आसिफ फुजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी सांगण्यात येत आहे.

अलिकडच्या काळात कश्मीरमधील हा सर्वात घातक दहशतवादी हल्ला मानला जात आहे. बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ची शाखा असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटचे सदस्य असल्याचे मानले जाणारे हल्लेखोर पहलगाममधील बैसरन कुरणात पर्यटकांवर गोळीबार करत होते.

कॅमफ्लाज पोशाख आणि कुर्ता-पायजामा घातलेले किमान 5-6 दहशतवादी दरीखोऱ्याच्या सभोवतालच्या दाट पाइन जंगलातून बैसरन कुरणात आले आणि त्यांनी एके-47 ने गोळीबार केला.

Pahalgam Terror Attack – सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी