
पहलगाम हल्ल्यानंतर पतंप्रधान नरेंद्र मोदींनी लागोपाठ पाच बैठका घेतल्या. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी वॉर रुममध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करू शकतात. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी तीन तासांत पाच बैठका घेतल्या होत्या. यावेळी पंतप्रधान मोदींनी CCS आणि CCPA च्या मोठ्या आणि महत्त्वाच्या बैठकींचे अध्यक्षपद भुषवले. यापूर्वी मंगळवारी तीनही सैन्यदलाच्या प्रमुखांसोबत पंतप्रधानांनी बैठक घेतली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पहलगाम हल्ल्यानंतरच्या सुरक्षेबाबत चर्चा झाली. पंतप्रधान यांच्या लोककल्याण मार्गाच्या अधिकृत निवास्थानात ही चर्चा झाली. या बैठकीत जम्मू कश्मीर आणि देशातील सुरक्षेवर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच सैन्याला फ्री हॅण्ड दिला आहे.
रशिया दौरा रद्द
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द झाला आहे. मोदी रशियाच्या विजयी दिवसाच्या परेडमध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीनसोबत सामील होणार होते. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि हिंदुस्थानमध्ये तणाव निर्माण झाला आहे, त्याच पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींऐवजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशिया दौऱ्यावर जातील.