Photo – श्रीयुत गंगाधर टिपरे मालिकेतील शलाका आठवते का? पाहा तिचे आताचे फोटो

2001 साली झी मराठीवर आलेली श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेत दिलीप प्रभावळकर, राजन भिसे, शुभांगी गोखले यांच्या मुख्य भूमिका होत्या. याच मालिकेतील शलाका ही भूमिका देखील खूप गाजली होती. ती भूमिका केलेली रेश्मा नाईक या अभिनेत्रीने. क्यूट, बबली, सुंदर दिसणारी शलाका नंतर कोणत्याच मालिकेत दिसली नाही. अभिनय विश्वातून जरी शलाकाने एक्झिट घेतली तरी ती आपलं खासगी आयुष्य अगदी मस्त जगतेय. शलाकाच्या इंस्टाग्रामवर तिचे फॅमिलीसोबत फोटो आहेत.