
श्रेयस अय्यरने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत विजयश्री खेचून आणला आणि चेन्नईचा 4 विकेटने पराभव झाला. प्रभासिमरन सिंगने 36 चेंडूंमध्ये 54 धावांनी वादळी खेळ केला. कर्णधार श्रेयसने 41 चेंडूंमध्ये 4 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 72 धावा चोपून काढल्या आणि संघाचा विजय पक्का केला. तत्पूर्वी चतुर चहलने आपल्या फिरकीची जादू दाखवत हॅट्रीक घेण्याची किमया साधली. चहल्या फिरकीमुळे आणि इतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यामुळे चेन्नईचा संपूर्ण संघ 190 धावांवर बाद झाली. या पराभवासह चेन्नईचा संघ आयपीएलमधून बाद होणारा पहिला संघ ठरला आहे.