
देशात उद्या, 1 मे 2025 पासून चार मोठे बदल होणार आहेत. या चार बदलांमध्ये बँक आणि रेल्वेच्या नियमांमध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. तसेच गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल होणार आहेत.
रेल्वेच्या नियमात 1 मे 2025 पासून बदल केला जाणार असून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा सर्वात जास्त फटका बसणार आहे. ज्या प्रवाशांनी रिझर्व्हेशन तिकीट काढले आहे, परंतु त्यांचे तिकीट वेटिंग लिस्टवर असेल अशा प्रवाशांना आता रेल्वेने प्रवास करण्यास बंदी आहे. जर प्रवाशांनी प्रवास केला तर त्यांना दंड भरावा लागणार आहे. स्लीपर, एसी डब्यात वेटिंग लिस्टवरील प्रवाशांना प्रवास करण्यास बंदी असून जनरल डब्यातून मात्र वेटिंग लिस्टवरील प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.
- बँकेच्या मुदत आणि बचत खात्यांवरील व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे. कारण आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केल्यामुळे अनेक बँकांनी व्याजदरात कपात केली आहे. तसेच घरगुती गॅस सिलिंडराच्या किमतीतसुद्धा बदल होण्याची दाट शक्यता आहे.
- z एक राज्य, एक बँक या धोरणानुसार, सर्व ग्रामीण क्षेत्रीय बँकांचे विलीनीकरण करून एकच मोठी बँक बनवली जाणार आहे. 1 एप्रिलला गॅसच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली होती. आता 1 मे रोजी नेमका काय बदल होणार आहे, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
























































