
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्र दिनानिमित्त खास मराठी भाषेतून शुभेच्छा दिल्या. जेव्हा आपण महाराष्ट्राबद्दल विचार करतो, तेव्हा समोर येतो तो या भूमीचा गौरवशाली इतिहास आणि इथल्या जनतेचे धैर्य. महाराष्ट्र राज्य देशाच्या प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे, राज्याच्या प्रगतीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा, असे मोदी यांनी म्हटले आहे.