
पहलगाम हल्ल्यामुळे मालवण-राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त हुकला आहे. 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनी पुतळ्याचे लोकार्पण केले जाणार होते, मात्र आता 11 मे रोजी लोकार्पण केले जाणार असल्याची माहिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी मालवण-राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण केले होते, मात्र निकृष्ट कामामुळे अवघ्या सहा महिन्यांतच तो पुतळा कोसळला होता. आता नवा 93 फूट उंच भव्य पुतळा लोकार्पणासाठी तयार आहे. जागतिक कीर्तीचे शिल्पकार राम सुतार यांनी तो साकारला आहे.