
एका प्रसिद्ध नामांकित कंपनीचे ई-मेल हॅक करून 11 लाखांची फसवणूक करणाऱ्या शेरल बलय्या याला दक्षिण सायबर पोलिसांनी अटक केली.
तक्रारदाराला एप्रिल महिन्यात त्यांच्या कंपनी सोबत काम करणाऱ्या कंपनीने एक ई-मेल पाठवून पेमेंटसाठी बँक तपशील पाठवले होते. तो मेल खरा समजून त्यांनी संबंधित कंपनीच्या खात्यात अकरा लाख रुपये ट्रान्स्फर केले. पैसे ट्रान्स्फर केल्यानंतर संबंधित कंपनीला माहिती देण्यात आली. तेव्हा पैसे मिळाले नसल्याचे समजले. बनावट कंपनीने त्यांच्या कंपनीचा मेल हॅक करून पैसे पाठवण्याचा ई-मेल केल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी त्यांनी दक्षिण सायबर पोलीसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आणि चेंबूर येथून शेरलला ताब्यात घेऊन अटक केली.