अदानीच्या पुतण्याकडून इनसाईड ट्रेडिंग, सेबीचा गंभीर आरोप; बजावली होती नोटीस

सेबीने उद्योगपती गौतम अदानी यांचे पुतणे आणि अदानी समूहाचे संचालक प्रणव अदानी यांच्यावर इनसायर ट्रेडिंगशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी 2024 मध्ये प्रणव अदानी यांना नोटीसही बजावण्यात आली होती.

प्रणव अदानी यांनी 2021 मध्ये अदाणी ग्रीन एनर्जीने केलेल्या एसबी एनर्जीच्या खरेदीशी संबंधित संवेदनशील माहिती त्यांचे मेहुणे कुणाल शाह यांना दिली होती. यातून शहा बंधुंनी शेअर ट्रेडिंग करून 90 लाख रुपयांचा नफा कमावला होता. या प्रकरणाची चौकशी करताना काॅल रेकाॅर्ड आणि ट्रेडिंग पॅटर्नचे विश्लेषण करण्यात आले. त्यानंतर सेबीने प्रणव अदानी यांनी इन्सायडर ट्रेडिंगशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. दरम्यान, प्रणव अदानी यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले असून कोणत्याही सिक्युरिटीज कायद्याचे उल्लंघन केले नसून हे प्रकरण मिटवण्यासाठी तोडगा हवा आहे असे म्हटले आहे.