
बॉलीवूड गायक सोनू निगम अडचणीत सापडला आहे. बेंगळुरूमध्ये नुकत्याच झालेल्या म्युझिक कॉन्सर्टचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये सोनू निगमने पहलगाम हल्ल्याबद्दल वादग्रस्त वक्तव्याने त्याच्यावर F.I.R दाखल करण्यात आला आहे.
बेंगळुरूमध्ये झालेल्या एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये एका चाहत्याने सोनू निगमला कन्नड कन्नड असे मोठ्याने ओरडत कन्नड गाणे गाण्याची विनंती केली. यावर सोनू निगम ने उत्तर देत पहलगाम हल्ल्याचा उल्लेख केला. त्यामुळे सोनू निगमवर FIR दाखल करण्यात आला आहे. चाहत्याने केलेली मागणी सोनू निगमने वेगळ्या अर्थाने घेतली आणि तो म्हणाला की, मी तुमच्या जन्माआधीपासून कन्नड गाणी गातोय. तुमच्या या वागण्यामुळेच पहलगाममध्ये हल्ला झाला आहे. याच प्रकारच्या वृत्ती कारणीभूत आहेत. चाहत्याने केलेल्या मागणीची सोनू निगमने थेट पहलगाम हल्ल्यासोबत तुलना केली. यामुळे बेंगळुरूमधील कन्नड संघटनांनी अवलाहल्ली पोलीस स्टेशनमध्ये सोनू निगम विरोधात FIR दाखल केली आहे. या वक्तव्यावर आता उत्तर देत सोनू निगम म्हणाला की, “कोणत्याही भाषेचा आणि संस्कृतीचा अपमान करणे हा माझा उद्देश नव्हता. कन्नड संगीतासोबत माझे नाते जुने आहे. परदेशी जेव्हा माझे कॉन्सर्ट असते तेव्हा मी एक कन्नड गाणे गातोच. मी तुमचा खूप आदर करतो, मी तुम्हाला खूप प्रेम करतो. म्हणून तुम्हीही थोडे सावधगिरी बाळगली पाहिजे, तुम्ही हे करू नये.”


























































