Tariff war – डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘टॅरिफ’ हल्ले सुरुच, विदेशातील चित्रपटांवर लावला 100 टक्के कर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ हल्ले सुरुच आहेत. विदेशातून आयात होणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ लावल्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा मनोरंजन क्षेत्राकडे वळवला आहे. अमेरिकेच्या चित्रपट उद्योगाला चालना देण्यासाठी ट्रम्प यांनी विदेशी चित्रपटांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. रविवारी रात्री उशीरा त्यांनी ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून याबाबत माहिती दिली.

अमेरिकेमधील चित्रपट उद्योग मरणासन्न अवस्थेत पोहोचला आहे. इतर देश आपल्या चित्रपट निर्मात्यांना आणि स्टुडिओना अमेरिकेपासून शक्य तितके दूर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे हॉलिवूडसह अमेरिकेतली इतर क्षेत्रांची रया जात आहे. इतर राष्ट्रांचे हे सामूहिक प्रयत्न असल्याने हा राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. हा एक प्रोपोगंडा असल्याने वाणिज्य विभाग आणि युनायडेट स्टेट्‍स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्हला अमेरिकेत प्रदर्शित होणाऱ्या विदेशी चित्रटांवर सरसकट 100 टक्के कर लादण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत, असे ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.