
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी महिन्यात घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला.राज्यात सलग तेराव्या वर्षी कोकण बोर्ड अव्वल ठरले आहे.कोकण बोर्डाचा निकाल 96.74 टक्के लागला आहे.रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 95.67 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 98.74 टक्के निकाल लागला आहे.कोकण बोर्डाच्या निकालाची माहिती आज बोर्डाचे सचिव सुभाष चौघुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोकण बोर्डातून बारावीच्या परीक्षेला 23 हजार 563 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी 22 हजार 797 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.कोकण बोर्डात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक असून 98.03 टक्के प्रमाण उत्तीर्ण होण्याचे आहे.कोकण बोर्डात 11 हजार 607 मुली परीक्षेला बसल्या त्यापैकी 11 हजार 379 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 95.50 टक्के आहे.11 हजार 957 मुले परीक्षेला बसले होते त्यापैकी 11 हजार 418 मुलगे उत्तीर्ण झाले आहेत अशी माहिती सचिव सुभाष चौघुले यांनी दिली.यावेळी सहाय्यक सचिव मनोज शिंदे आणि सहसचिव दीपक पवार उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 99.27 टक्के
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल 98.74 टक्के लागला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 8 हजार 266 विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकी 8 हजार 161 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 95.67 टक्के लागला असून रत्नागिरी जिल्ह्यातून 15 हजार 297 विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकी 14 हजार 635 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातून 7 हजार 705 मुले परीक्षेला बसली त्यापैकी 7 हजार 242 मुले उत्तीर्ण झाली.मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 93.99 टक्के आहे.7 हजार 592 मुली परीक्षेला बसल्या होत्या त्यापैकी 7 हजार 393 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 97.37 टक्के आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 4 हजार 521 मुले परीक्षेला बसली त्यापैकी 4 हजार 176 मुले उत्तीर्ण झाली.मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 98.23 टक्के आहे.4 हजार 15 मुली परीक्षेला बसल्या होत्या त्यापैकी 3 हजार 986 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 99.27 टक्के आहे.
गतवर्षीच्या तुलनेने 0.77 टक्के निकालात घट
कोकण बोर्ड सलग 13 व्या वर्षी राज्यात अव्वल ठरले आहे.मात्र गतवर्षीच्या तुलनेने कोकण बोर्डाच्या निकालात 0.77 टक्के घट झाली आहे.गतवर्षी 97.51 टक्के निकाल होता यंदा मात्र 96.74 टक्के निकाल लागला आहे.
कॉपीचे प्रकार नगण्य
कोकण बोर्डात यंदाच्या बारावीच्या परीक्षेत कॉपीचा एकमेव प्रकार रत्नागिरी जिल्ह्यात घडला.सिंधुदुर्ग मध्ये एका विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेचे पान फाडल्याचा प्रकार घडला होता.
पुनर्मुल्याकंनासाठी करू शकतो अर्ज
एखाद्या विद्यार्थ्याला जर एखाद्या विषयात कमी गुण मिळाले असे वाटत असेल तर तो पुनर्मुल्याकंनासाठी अर्ज करू शकतो.पहिल्या टप्प्यात तो गुणपडताळणी करू शकतो.त्यानंतर तो पेपरची फोटो कॉपी घेऊन आपल्या उत्तरांना योग्य गुण दिले आहेत की नाही हे जाणून घेऊ शकतो.त्यानंतरही जर त्या विद्यार्थ्याला आपण उत्तर बरोबर लिहूनही गुण कमी दिले असे वाटत असेल तर तो त्याच्या महाविद्यालयाच्या शिक्षकाकडून ते उत्तर तपासून घेऊन पुनर्मुल्याकंनासाठी अर्ज करू शकतो असे कोकण बोर्डाचे सचिव सुभाष चौघुले यांनी सांगितले.
शाखानिहाय निकाल
शाखा. टक्के
विज्ञान. 98.16
कला. 92.21
वाणिज्य. 98.06
व्यवसायिक
अभ्यासक्रम 97.23
टेक्निकल सायन्स 92.15