
मागील वर्षीच्या 91.95 टक्के निकालाच्या तुलनेत मुंबईचा बारावीचा निकाल यंदा साधारण एक टक्क्याने वाढला आहे. गेल्या तीन वर्षांतील टक्केवारी पाहता निकालात तब्बल पाच टक्क्यांची घसघशीत वाढ झाल्याचे दिसून येते.
इतर विभागीय मंडळांच्या तुलनेत कोकण, कोल्हापूरपाठोपाठ मुंबईचा निकाल लागला आहे. यंदा मुंबईतून एकूण 3,14,144 नियमित विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 2,91,955 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी जास्त म्हणजे 94.33 टक्के आणि मुलांची 91.60 टक्के आहे.
विज्ञान शाखेचा निकाल सर्वधिक म्हणजे 96.33 टक्के इतका लागला आहे. तर इतर शाखांमध्ये कला शाखेचा 84.63 टक्के, कॉमर्स शाखेचा निकाल 92.59 टक्के लागला आहे. तर व्यवसाय अभ्यासक्रमाचा 91.34 आणि आयटीआयचा 78.28 टक्के इतका निकाल लागला आहे.
शाखानिहाय परीक्षा दिलेले नियमित व उत्तीर्ण विद्यार्थी
विज्ञान – 1,17,720 – 1,13,410 (96.33 टक्के)
कला – 39,833 – 33,713 (84.63 टक्के)
कॉमर्स – 1,52,862 – 1,41,537 (92.59 टक्के)
व्यवसाय अभ्यासक्रम – 2,877 – 2,628 (91.34 टक्के)
आयटीआय – 852 उत्तीर्ण – 667 (78.28 टक्के)
मुंबईचा गेल्या काही वर्षातील निकाल
2025 92.93 टक्के
2024 91.95 टक्के
2023 88.13 टक्के
2022 90.91 टक्के
जिल्हानिहाय निकालात रायगडची बाजी
मुंबई विभागात रायगड जिल्ह्याने अव्वल कामगिरी करत 94.66 टक्के इतका निकाल नोंदवला. त्याखालोखाल ठाणे जिल्हा 93.74 टक्के नोंदवून दुसऱ्या क्रमांकावर आहे. पालघर – 92.19 टक्के बृहन्मुंबई – 90.67 टक्के मुंबई उपनगर 1 – 93.18 टक्के मुंबई उपनगर 2 – 92.27 टक्के