
मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथील माजी उपसरपंचाचा डोंगरावर चालण्यासाठी गेले असता मधमाश्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ही घटना घडली.
हनुमंत बबुशा कोयते (वय 44) असे मृत उपसरपंचाचे नाव आहे. कोयते नेहमीप्रमाणे मित्रांसमवेत डोंगरावर चालण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. यात त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या. सोबतच्या मित्रांनी तातडीने त्यांना सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला.