Operation Sindoor मुळे पाकिस्तानची टरकली, अजित डोवाल यांना पाकच्या NSA चा विनवणी करणारा फोन!

हिंदुस्थानच्या सैन्याने ऑपरेशन सिंदूरने देशवासियांना न्याय मिळवून दिला. सैन्याने दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्याने पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पण हतबलपणा लपवण्यासाठी पाकिस्तान अनेक खोटे दावे करत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ‘खून की हर बूंद का बदला लेंगे, असे विधान केले. पण कितीही मोठी विधाने केली तरी त्यांची घाबरगुंडी उडाल्याचे वारंवार दिसून आले आहे. आता देखील ऑपरेशन सिंदूर संपल्यानंतर काहीवेळातच पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि आयएसआय गुप्तचर संघटनेचे प्रमुख असीम मलीक यांनी हिंदुस्थानसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला.

Operation Sindoor- S-400 हिंदुस्थानच्या आकाशातील सर्वात घातक शिकारी! यानेच सीमेवर पाकिस्तानी क्षेपणास्त्रे केली गिळंकृत, वाचा

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकड्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. ऑपरेशन सिंदूर संपल्यानंतर आयएसआय गुप्तचर संघटनेचे प्रमुख असीम मलीक यांनी हिंदुस्थानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. असीम मलीक यांनी अजित डोवाल यांनी फोनवर संवाद साधला. यावेळी असीम यांनी फोनवर अजित डोवाल यांच्याकडे विनवणी केल्याचे वृत्त आहे.

…तोपर्यंत बदला पूर्ण होणार नाही! सर्वपक्षीय बैठकीत शिवसेनेने मांडली भूमिका, संजय राऊत यांचे ट्विट

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात भाष्य केलेय. पाकिस्तान आणि राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेत (NSA) संपर्क झाला होता, असे त्यांनी सांगितले. मात्र, यांच्यातील संभाषणाचा नेमका तपशील अद्याप समोर आलेला नाही.