Tahawwur Rana तहव्वूर राणाची कोठडी 6 जून पर्यंत वाढवली

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा याच्या एनआयए कोठडीत 6 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. राणाला आज दिल्ल्लीतील एनआयए कोर्टात हजर करण्यात आले होते.

16 वर्षांच्या लढाईनंतर प्रत्यार्पण

166 निरपराध नागरिकांचा बळी घेणारा, 26 नोव्हेंबर 2008च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड, लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी तहव्वूर हुसेन राणा याला अखेर 10 एप्रिलला विशेष विमानाने हिंदुस्थानात आणण्यात आले. यूपीए सरकारच्या काळात 2009मध्ये अमेरिकेत त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. तब्बल 16 वर्षांच्या लढाईनंतर अखेर त्याचे हिंदुस्थानात प्रर्त्यापण करण्यात आले.