
पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर हिंदुस्थानी सैन्याने राबवलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ यामुळे पाकिस्तानचे कंबरडे चांगलेच मोडले आहे. परंतु असे असले तरी, याचा परिणाम मात्र कश्मिरच्या खोऱ्यावर अत्यंत विपरीत झालेला आहे. सध्याच्या घडीला पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा खातमा झाला असला तरी, या घटनेची दुसरी बाजू तितकीच भयावह असल्याचे मत जम्मू कश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केले. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत या झालेल्या आॅपरेशन सिंदुरची दुसरी गडद बाजू त्यांनी उपस्थित केली.
सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय पटलावर कश्मिरचे नाव हे खूपच मलिन झाल्याचे मत यावेळी त्यांनी केली. हे कश्मिरचे नाव मलिन करण्यात पाकिस्तानला चांगलेच यश आले असल्याचे ते यावेळी म्हणाले. अधिक बोलताना ते म्हणतात, सध्याच्या घडीला दहशतीच्या वातावरणामुळे कश्मिरचे खोरे अतिशय उदासीन झालेले आहे. खोऱ्यात यावेळी अक्षरशः भयाण शांतता पसरली आहे.
आॅपरेशन सिंदूर नंतर कश्मिरचे पर्यटन आता पूर्ववत व्हायला खूप अवधी जाणार यात काहीच दुमत नाही. या आॅपरेशन अंतर्गत 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात हिंदुस्थानला यश मिळाले आहे. परंतु कश्मिरचे नाव मात्र जगाच्या नकाश्यावर मलिन झाले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून कश्मिरमध्ये गेल्या काही वर्षात पर्यटनाला बहर आलेला होता. परंतु पाकिस्तानने केलेल्या कृत्यामुळे सध्या खोऱ्याची अवस्था अक्षरशः उद्धवस्त झाल्यासारखी झालेली आहे.
22 एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कश्मिर अक्षरशः कोलमडले. पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे, बहुतांशी पर्यटकांनी कश्मिरकडे पाठ वळवली. त्यामुळे कश्मिरच्या अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली आहे. त्यात आॅपरेशन सिंदूरनंतर तर कश्मिर जगाच्या पटलावर अधिक ठळकपणे मलिन झालेले आहे.