
गेल्या वर्षी गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली होती, मात्र यंदा ही संख्या वाढताना दिसत आहे. जानेवारी ते मार्च 2025 मध्ये गोव्यात पर्यटनात 10.5 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पर्यटन विभागाने सांगितले. जानेवारी ते मार्च 2024 मध्ये 25. 8 लाख पर्यटक गोव्यात आले होते. यंदा जानेवारी ते मार्च 2025 या तीन महिन्यांत 28.51 लाख पर्यटकांची नोंद झाली आहे.
गोव्यातील पर्यटकांची संख्या वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. पर्यटकांसाठी विविध ऑफर्स, नव्या बाजारपेठा, आंतरराष्ट्रीय हवाई कनेक्टिव्हिटी आदींमुळे पर्यटकांची पावले गोव्याकडे वळत असल्याचे पर्यटन विभागाच्या अधिकाऱयांनी सांगितले. तर धोरणात्मक विमान वाहतूक भागीदारीमुळेही मदत झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘एअर इंडिया एक्सप्रेसची आधीच दुबईशी थेट कनेक्टिव्हिटी होती. आता त्यांनी गोव्यातून थेट कुवेत आणि अबूधाबी सेवाही सुरू केली आहे. आखाती वाहकांशी सततच्या संबंधांमुळे आणि मध्य पूर्वेतील विमान वाहतूक केंद्रांमधील ट्रान्झिट मार्पेटमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नांमुळे याला पाठिंबा मिळाला’, असे पर्यटन अधिकाऱयाने सांगितले. मे महिन्यात शाळेच्या सुट्टय़ांमुळे पर्यटक वाढतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गोवा बियॉन्ड बीचेस उपक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन होते. सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे पर्यटक आकर्षितदीप पर्व, रापोंकाराचो सीफूड फेस्टिव्हल, चिखल कालो, साओ जोआओ फेस्टिव्हल, फेस्टाविस्टा, स्पिरिट ऑफ गोवा फेस्टिव्हल आणि हेरिटेज फेस्टिव्हल यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे पर्यटक गोव्यात आकर्षित होत आहेत. मान्सून ट्रव्हल पॅकेजेस मध्य पूर्वेतील मार्पेटमध्ये लोकप्रिय होत आहेत’, असेही पर्यटन विभागाने स्पष्ट केले.