स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यात एक लाख EVM ची गरज, व्हीव्हीपॅटची गरज नाही

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीसाठी एक लाख ईव्हीएमची गरज भासणार आहे. राज्यात 29 महानगरपालिका, 290 नगर परिषदा, 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचात समित्यांची निवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे 35 हजार ईव्हीएमची कमतरता आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडे 65 हजार बॅलोट्स आणि कंट्रोल युनिट्स आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. राज्यातील निवडणुकीसाठी 1 लाख मशिन्सची गरज आहे, असेही या अधिकाऱ्याने नमूद केले.

मालमत्ता जप्तीच्या अधिकाराचा गैरवापर कधीही होऊ देऊ नका, हायकोर्टाने ठणकावले; जरा सावधगिरी बाळगा

राज्य निवडणूक आयोगाने नगरविकास आणि ग्रामविकास विभागांना वॉर्ड पुर्नरचनेचे आदेश दिले आहे. त्यानंतरच राज्यात किती ईव्हीएएमची गरज लागेल, हे लक्षात येईल. राज्यात किती वॉर्ड आणि पॅनेल्स आहेत याची अधिसूचना लवकरच प्रशासनाला काढावी लागणार आहे. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाखहून अधिक मशिन वापरल्या गेल्या होत्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकां सारखी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटची गरज नाही.