
हिंदुस्थानच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानला खूप नुकसान झाले आहे. असे असले तरीही पाकिस्तान मात्र जगभर खोट्या बातम्या पसरवण्यात मग्न आहे. हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना त्यांची 5 विमाने पाडली. यामध्ये 2 लढाऊ विमानांचाही समावेश होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. सैन्याने 6 आणि 7 मे रोजी दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली. यानंतर,8 आणि 9 मे रोजी 3 विमाने पाडण्यात आली. हिंदुस्थानने पाकिस्तानचे 2 जेएफ 17, 1 मिराज जेट, 1 अवाक आणि 1 सी-130 पाडले पण पाकिस्तान अजूनही जगभरात खोट्या बातम्या पसरवत आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी अलिकडेच त्यांच्या संसदेत पाकिस्तानी हवाई दलाचे खोटे कौतुक केले होते. त्यांनी म्हटले होते की, द टेलिग्राफने पाकिस्तान हवाई दलाचे कौतुक करणारा लेख प्रकाशित केला आहे. तर ही बातमी खोटी असल्याचे निष्पन्न झाले. पाकिस्तानच्या द डॉन वृत्तपत्राने त्याची सत्यता पडताळून ती खोटी असल्याचे घोषित केले होते. इशाक दार म्हणतात की पाकिस्तानने 6 हिंदुस्थानची विमाने पाडली होती.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला, परंतु पाकिस्तानी सैन्यानेही त्यात उडी घेतली. हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानी सैन्यावर गोळीबार केला आणि त्यांचे मोठे नुकसान केले. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानी हवाई दलाचे 5 जवान मारले गेले. यामध्ये स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसूफचाही समावेश होता. पाकिस्तानी लष्कराच्या एका निवृत्त एअर मार्शलनेही नुकसानीचा खुलासा केला. ते म्हणाले की, हिंदुस्थानने खूप नुकसान केले आहे.