
चुकीच्या जीवनशैलीमुळे वजन वाढण्याचे प्रमाण वाढत चालेले आहे. वाढत्या वजनामुळे अनेक आजारही होतात. त्यामुळे वजन कमी करणे खूप महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी घरातील अन्नाचे सेवन सर्वात उत्तम ठरेल. पण यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचे आणि किती अन्न खात आहोत हे जास्त महत्वाचे असते. या सगळ्यामध्ये अनेकांना प्रश्न पडतो की साधे, सिपंल घरी शिजवलेले अन्न वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहे की नाही. त्याच वेळी काही लोकं महागडे डाएट फूड आणि रेडी-टू-ईट हेल्दी स्नॅक्स वजन कमी करण्याचा शॉर्टकट मानतात. वजन कमी करण्यासाठी घरी शिजवलेले अन्न चांगले आहे की डाएट फूड जाणून घेऊया सविस्तर.
घरगुती जेवणात काय खास आहे?
घरी शिजवलेले अन्न संतुलित आणि पोषक तत्वांनी समृद्ध असते. ज्यामध्ये डाळी, भाज्या, चपाती, भात, सॅलड, दही इत्यादींचा समावेश असतो. घरी बनवलेल्या अन्नामध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारखे पोषक घटक असतात. जे एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
घरगुती जेवणाचे फायदे
घरी शिजवलेल्या अन्न ताजे असते. तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार आणि आरोग्यानुसार घरी कमी तेल, कमी मीठ वापरून आणि कोणत्याही प्रक्रियेशिवाय बनवू शकता. त्याच वेळी घरगुती अन्नात कोणतेही प्रिजर्वेटिव्ह नसतात. याशिवाय, घरगुती अन्नामुळे पोट बराच काळ भरलेले राहते. त्यामुळे अधिक खाणे टाळले जाते.
डाएट फूड म्हणजे काय?
डाएट फूड म्हणजे जे वजन कमी करण्यासाठी किंवा तंदुरुस्त राहण्यासाठी विशेषतः तयार केलेले पदार्थ. यामध्ये बहुतेकदा मील रिप्लेसमेंट शेक किंवा बार, ओट्स, ग्रॅनोला, मुएसली, लो-कार्ब स्नॅक्स, फॅट-फ्री किंवा शुगर-फ्री प्रॉडक्ट, रेडी-टू-ईट हेल्दी जेवण यांचा समावेश असतो. हे पदार्थ “हेल्दी” म्हणून विकले जातात.
डाएट फूडचे फायदे
डाएट फूडमध्ये कॅलरीज नियंत्रित करणे सोपे आहे. कारण हे डाएट फूड लवकर तयार करता येतात, ज्यामुळे वेळही वाचतो. तुम्ही प्रवास करताना किंवा ऑफिसच्या वेळेत याचे सेवन सहजपणे करू शकता.
वजन कमी करण्यासाठी कोण सर्वोत्तम आहे?
घरगुती अन्न आणि डाएट फूड दोघांचेही स्वतःचे महत्त्व आहे, परंतु जेव्हा वजन कमी करण्याचा विचार येतो तेव्हा घरगुती पदार्थ हा एक चांगला आणि अधिक प्रभावी पर्याय मानला जातो. घरी शिजवलेल्या अन्नात पोषणाचे संतुलन असते. जसे की डाळी, भाज्या, चपाती भात आणि सॅलड, जे शरीराला आवश्यक प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि जीवनसत्त्वे प्रदान करतात. तसेच तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि आरोग्यानुसार ते बनवू शकता.
दुसरीकडे, डाएट फूड, कमी कार्बयुक्त स्नॅक्स किंवा तयार आरोग्यदायी पदार्थ यासारखे आहारातील पदार्थ सहसा महाग असतात आणि त्यात लपलेले कृत्रिम घटक तूमच्या शरीरासाठी काही काळानंतर हानिकारक ठरू शकतात. डाएट फूडमुळे लवकर वजन कमी होते, पण घरी बनवलेले अन्न तुम्हाला दीर्घकाळ निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)