Thane News – कल्याणमध्ये मद्यधुंद चालकाची 6 ते 7 वाहनांना धडक, एक जण गंभीर जखमी

मद्यधुंद कारचालकाने 6 ते 7 वाहनांना धडक दिल्याची घटना कल्याणमधील बिर्ला कॉलेज रोडवर शुक्रवारी घडली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर नागरिकांनी कारचालकाला बेदम चोप दिला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालक राँग साईडने गाडी चालवत होता. कारने आधी डंपरला धडक दिली, त्यानंतर जळपास पाच वाहनांना उडवलं. जखमीला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू आहे.