Jalna News – धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, मायलेकीचा जागीच मृत्यू

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्री जवळील सौंदलगाव फाटा परिसरात सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू झाला आहे. तीनजण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

सदर घटना सोमवारी (19 मे 2025) सकाळी घडली आहे. चव्हान कुटुंब छत्रपती संभाजीनगरहून बीडच्या दिशेने जात होतं. याच दरम्यान सौदलगावजवळ गाडी आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रन सुटल्याने गाडीने रस्ता सोडला आणि गाडी पलटी झाली. गाडीचा वेग जास्त असल्याने या भयंकर अपघातात गाडीचा चुरडा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांची नावे नुरवी अमरदीप चव्हाण (वय अडीच वर्षे), रोहिणी अमरदीप चव्हाण (30) या दोघी मायलेकींचा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला. तर अमरदीप बाबूराव चव्हाण (40), विश्रांती प्रदीप चव्हाण (29), रुद्रांश प्रदीप चव्हाण (वय 2 वर्षे) गंभीर जखमी झाले आहेत. तिघांना स्थानिकांनी तात्काळ पाचोडा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.