संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुनावणी 3 जूनला

केज तालुक्यातील मस्साजोग येथील पवनचक्की खंडणी व सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी बीड जिह्यासह अवघा महाराष्ट्र हादरला होता. या हत्येतील आरोपी बीड जिल्हा कारागृहात असलेला वाल्मीक कराड व इतर आरोपींची आज सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सरकारी वकील व आरोपीचे वकील यांच्यामध्ये जवळपास दहा मिनिटे युक्तिवाद झाला. यामधील आरोपी असलेला विष्णू चाटे याने मागील तारखेला देशमुख हत्या प्रकरणातून दोषमुक्त करण्यात यावे यासाठी अर्ज केला होता. परंतु आज तो जामीन अर्ज मागे घेण्यात आल्याची व पुढील सुनावणी 3 जून रोजी असल्याची माहिती वकिलांनी दिली.