शिवसेनेच्या वतीने फणसावर कार्यशाळा; रत्नागिरी, कुडाळमध्ये मार्गदर्शन शिबीर

‘तुमचो फणस, आमचो फणस, बघू या कोणाचो सरस फणस,’ ‘पिकपिकपिकतो, घमघमाट सुटतो, आंब्यालाही मागे आता टाकतो फणस’ या टॅगलाईनखाली ‘फणस ः एक व्यवसायातील संधी’ या विषयावर शिवसेना पक्षाच्या वतीने कोकणवासीयांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

बुधवार 21 मे रोजी सिंधुदुर्गातील कुडाळ येथील मराठा समाज हॉल (कुडाळ हायस्कूलनजीक) येथे दुपारी 2 ते सायं. 5 या वेळेत, तर गुरुवार 22 मे रोजी रत्नागिरीत दुपारी 2 ते सायं. 5 या वेळेत माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा निःशुल्क आहे. या कार्यशाळेत फणसातील औषधी गुणधर्म, उपउत्पादनातील व्यवसाय संधी, शासकीय कर्ज प्रक्रियेची माहिती, मूल्यवर्धित पदार्थांच्या विक्रीची हमी, फणसाची मूल्यवर्धित उपउत्पादने, उपउत्पादने बनविण्याची प्रक्रिया, परदेशी बाजारपेठेची उपलब्धता याबाबत सखोलपणे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कोकणवासीयांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक श्रेया परब यांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी संपर्क (रत्नागिरी)ः वेदा फडके – 9423293001, नेहा माने – 7498613040.