
ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेजवळ अनेक ठिकाणी गोळीबार केला. त्याला हिंदुस्थानी सैन्य आणि बीएसएफने चोख प्रत्युत्तर दिले. 9,10 मे रोजी रात्री पाकिस्तानने पंजाबच्या अजनाला सेक्टरमधून घुसखोरीचा प्रयत्न केला, बीएसएफच्या सतर्क जवानांनी तो हाणून पाडला. आता दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीचा करार झाला आहे. मात्र, घुसखोरीची घटना आणि बीएसएफ जवानांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळी घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी रेंजर्सनी पळ काढला. त्याची माहिती मिळाली आहे.
पाकिस्तानी रेंजर्स अजनाला सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करत होते. त्यावेळी बीएसएफने सतर्केता दाखवत प्रत्युत्तरादाखल कारवाई सुरू केली आणि घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी रेंजर्सनी पळ काढलाय बीएसएफ जवानांनी सांगितले की, 9,10 मे च्या रात्री पाकिस्तानी रेंजर्सनी अंधाराचा फायदा घेत अजनाला सेक्टरमध्ये हिंदुस्थानी सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी रेंजर्सनी भारतीय सीमेत घुसण्यासाठी गोळीबार केला, परंतु बीएसएफच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे त्यांचे मनसुबे उधळून लावण्यात आले.
दहशतवादी भारतीय सीमेत घुसू शकतात असा भ्रम निर्माण करण्यासाठी पाकिस्तानी रेंजर्सनी भारतीय सीमेत घुसण्यासाठी गोळीबार केला. पण बीएसएफच्या शूर सैनिकांनी पाकिस्तानचा हा कट पूर्णपणे हाणून पाडला. बीएसएफने केवळ घुसखोरी थांबवली नाही तर पाकिस्तानी चौक्यांचे मोठे नुकसानही केले. बीएसएफच्या या कृतीमुळे संपूर्ण देशात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.