
व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर्स घेऊन येतो. यापूर्वी व्हॉट्सअॅपने स्टेटस म्युझिक हे फिचर लॉन्च केले होते. म्हणजेच इन्स्टाग्रामप्रमाणे व्हॉट्सअॅपच्या स्टेटसवरही आपण गाणी लावू शकतो. या नव्या फिचरमुळे युजर्सला लाखो गाण्यांच्या पर्यायातून आवडत्या गाण्यासोबत फोटो जोडता येईल. दरम्यान आता व्हॉट्सअॅपने Whatsapp walkie talkie हे नवे फिचर लॉन्च केले आहे. या फिचरचा नेमका वापर काय हे आपण जाणून घेणार आहोत.
व्हॉट्सअॅपचे वॉकी टॉकी हे फिचर फक्त ग्रुपपुरते मर्यादित आहे. कोणत्याही ग्रुपच्या चॅट बॉक्समध्ये जा. त्यानंतर चॅटमध्ये जाऊन स्वाईपअप करा. तेव्हा व्हॉट्सअॅपचे वॉकी टॉकी हे फिचर चालू होईल. यानंतर ग्रुपमधील कोणताही व्यक्ती तुम्हाला जॉईन होऊ शकतो. वॉईस चॅट असा मॅसेज आला तर वॉकी टॉकी फिचर चालू झाले असे समजावे. यावेळी जर बाकी ग्रुपच्या मित्रांना आपल्याला याबद्दल सांगायचे असेल तर वॉईस चॅटच्या बाजूला वेव्हिंग हॅन्ड दिसेल त्यावर क्लिक करा. यामुळे तुमच्या इतर मित्रांना या फिचर बाबात माहिती मिळेल.