
तीव्र उष्णतेपासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी जयपूरच्या नाहरगड बायोलॉजिकल पार्कने अनेक व्यवस्था केल्या आहेत. प्राण्यांच्या कुंपणात डेझर्ट कुलर तसेच त्यांच्या आहारात आईस्क्रीम आणि सत्तू यांचा समावेश करण्यात आला आहे. वाघ आणि सिंहाच्या पिलांवर विशेष लक्ष दिले जाते. त्यातील काही पिल्लं पहिल्यांदाच कडक उष्णतेचा अनुभव घेत आहेत. ज्येष्ठ पशुवैद्यकीय डॉक्टर अरविंद माथूर म्हणाले की, प्राण्यांच्या आहारात फळांचे आईस्क्रीम समाविष्ट करण्यात आले आहे. अस्वलांना ‘सत्तू’ (प्रथिनेयुक्त पीठ), मध आणि विशेष फळांचे आईस्क्रीम दिले जात आहे, तर हरण आणि पाणघोड्यांना टरबूज आणि काकडी दिली जात आहे, असे डॉ. माथूर म्हणाले.