‘धडक 2’ला सेन्सॉर बोर्डाचा झटका

अभिनेत्री तृप्ती डिमरी आणि अभिनेत्री सिद्धांत चतुर्वेदी यांच्या ‘धडक 2’ या चित्रपटाची चर्चा आहे. हा चित्रपट आधी 2024 मध्ये प्रदर्शित होणार होता, पण आता ‘धडक 2’ या वर्षी प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने त्यावर कात्री लावली होती, त्यामुळे आता निर्मात्यांना चित्रपटात अनेक बदल करावे लागतील. रोमॅण्टिक-ड्रामा चित्रपट ‘धडक 2’ ला सीबीएफसीकडून यू/ए 16 प्लस प्रमाणपत्र मिळाले आहे. दरम्यान, सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात 16 कट केले आहेत. अशा परिस्थितीत चित्रपटातून काही खास दृश्ये आणि शब्द काढून टाकले जातील किंवा बदलले जातील.

कोणते बदल सुचवले

संवाद ः ‘3,000 वर्षांचा अनुशेष फक्त 70 वर्षांत भरून निघणार नाही’ या वाक्याची जागा ‘अनेक वर्षांच्या भेदभावाचा अनुशेष फक्त 70 वर्षांत भरून निघणार नाही’ या वाक्याने घेतली आहे.

‘धडक 2’ मधली संवादात ः ‘ते एक धार्मिक काम आहे’, हे वाक्य काढून ‘हे एक पुण्य काम आहे’ असे वाक्य घेण्यास सांगण्यात आले.

सेन्सॉर बोर्डाने काही जातिवाचक शब्द वगळले आहेत. ‘सवर्ण को सडक… हमें जला देते है’ किंवा ‘ना सडके हमारी थी…ना जमीन हमारी थी…’ असे संवादही बदलण्यात आले आहेत.

सीबीएफसीने ‘ठाकूर का कुआं’ या कवितेतील एक अध्याय सेन्सॉर केला आहे आणि एका गाण्यात संत तुलसीदासांची एक ओळ बदलली आहे.