मान्सून फेस्टिव्हल आणि ट्रेकिंग… चला गोव्याला जाऊ

पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोवा राज्याने विशेष पावले उचलली आहेत. श्रीलंका, व्हिएतनाम, इंडोनेशिया या देशांसोबत गोव्याची स्पर्धा आहे. स्पर्धेला तोंड देताना गोव्यात मान्सून फेस्टिव्हल, ट्रेकिंग स्पर्धा असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यंदाच्या पावसाळ्यात साओ जोआओ, चिखल कालो आणि बोंडेरा यासारख्या फेस्टिव्हलचा आनंद घेता येईल.

गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी नुकतीच ट्रव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा, हॉटेल व्यावसायिक आणि विमान कंपन्यांसोबत बैठक घेतली. 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटनावर बराच परिणाम झाला आहे. गोव्यातील पर्यटकांची संख्या घटली आहे. अनेकांनी गोवा ट्रीप रद्द केलीय. या पार्श्वभूमीवर पावसाळी पर्यटनावर लक्ष असल्याचे पर्यटनमंत्री खंवटे म्हणाले. गोवा बियॉण्ड बीचेस ही संकल्पना प्रत्यक्ष कशी येईल यादृष्टीने नियोजन केले जाणार आहे. यूएई आणि मध्य पूर्वेकडील पर्यटकांना आकर्षित केले जाणार आहे.