
पावसाळ्यात आपल्याला अनेकदा चेहऱ्यावर मुरुम किंवा पिगमेंटेशनमुळेही डाग येतात. हे डाग चेहऱ्याचे सौंदर्य कमी करतात. यामुळे चेहरा खूप निस्तेज दिसू लागतो. अशावेळी डाग दूर करण्यासाठी, आपण काही घरगुती उपाय करु शकतो. या घरगुती उपचारांमध्ये दही देखील समाविष्ट आहे. पावसाळ्यामध्ये त्वचेसाठी दही लावणे हे खूप फायदेशीर आहे. त्यात लॅक्टिक अॅसिड असते, यामुळे त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत मिळते. याशिवाय दह्यामुळे त्वचेचा रंग सुधारण्यास देखील मदत मिळते. दही त्वचेवरील टॅनिंग, पिंपल्स, पिगमेंटेशन आणि सुरकुत्या या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करू शकते. चेहऱ्यावर नियमितपणे दही लावल्याने त्वचा मऊ आणि चमकदार होते.
दही आणि बेसन
चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी, बेसन दह्यात मिसळून लावू शकता. बेसन त्वचेवरील घाण आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करते. त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी ते प्रभावी आहे. यासाठी एका भांड्यात 2 चमचे बेसन घ्या. त्यात 2 चमचे दही घाला आणि चांगले मिसळा. आता ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या. सुमारे 10-15 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावावे.
दही आणि लिंबू
चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी दह्यात लिंबू मिसळून लावू शकता. लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड असते. यामुळे डाग आणि टॅनिंग कमी होण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेचा रंग सुधारतो. यासाठी एका भांड्यात 2 चमचे दही घ्यावे. त्यात एक चमचा लिंबाचा रस घालावा चांगले मिक्स करुन घ्यावे. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. आठवड्यातून 2-3 वेळा वापरल्याने हळूहळू सर्व डाग निघून जातील.