
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. असे असले तरी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने घाबरून जाऊ नका असे आवाहन केले आहे. दिल्ली, महाराष्ट्र आणि केरळसह संपूर्ण देशात कोरोनाचे हजारो रुग्ण सापडले आहेत. एकट्या दिल्लीत कोरोनाचे 99 सक्रिय रुग्ण आहेत.
कोरोनोच्या नव्या व्हेरियंटमुळे कोरोना वाढल्याचे सांगितले जात आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार NB. 1.8.1 आणि LF.7, JN.1 या व्हेरियंटमुळे कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. अमेरिका आणि चीनमध्येही नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. आणि आता आशिया खंडातीलही अनेक देशांतही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
ICMR चे संचालक डॉ. राजीव बहल म्हणाले की आतापर्यंत जे रुग्ण आढळले आहेत ते फार गंभीर नाहीत. त्यामुळे देशात जरी कोरोनाचे रुग्ण वाढत असलीत तरी फार चिंतेची बाब नाही असे बहल म्हणाले. तसेच सापडलेल्या रुग्णांमध्ये गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी असल्याचेही त्यांनी सांगितले.