
वायू प्रदूषणामुळे हृदयाविकाराचा वाढता धोका पाहता जगभरात चिंता व्यक्त होत आहे. अशातच घरातील हवेची गुणवत्ता सुधारणे हृदयरोगींसाठी फायदेशीर ठरू शकते. यावर केरळमधील श्री चित्रा तिरुनल इन्सिटय़ुटमधील संशोधकांनी व्यापक अभ्यास केला. घरातील वायू प्रदूषण कमी केल्याने हृदयरोग असलेल्या लोकांचे आरोग्य सुधारू शकते का हे निश्चित करणे हे या अभ्यासाचे उद्दिष्ट आहे. वायू प्रदूषणाला शहरे आणि वाहतुकीची समस्या कारणीभूत असल्याचे बोलले जाते. परंतु घरातील वायूप्रदूषण तितकेच धोकादायक आहे. स्वच्छ हवेत श्वास घेतल्याने गुंतागुंत, रुग्णालयात दाखल होणे आणि मृत्यू कमी होऊ शकतात.


























































