आता मंत्रालय व विधिमंडळ अदानीला कधी देणार? काँग्रेसचा संतप्त सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली डम्पिंग ग्राऊंड, कुर्ला मदर डेअरी आणि वांद्रय़ाच्या एमएसआरडीसी कार्यालयाची जागाही अदानीला दिली. आता मंत्रालय आणि विधिमंडळ अदानीला कधी देणार, असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारला केला आहे.

अवकाळीग्रस्त शेतकऱयाला मदत करायला महायुती सरकारकडे पैसे नाहीत, लाडक्या बहिणींना द्यायला पैसे नाहीत, पण अदानीला द्यायला मात्र सरकार तत्पर आहे, अशी टीका त्यांनी केली. मदर डेअरीची जागा अदानीला देण्याचा निर्णय मागे घ्या, अशी मागणी त्यांनी केली.