
मित्रांना पार्टी देण्यासाठी व्यावसायिकाच्या घरातून दागिन्यांची चोरी करणाऱ्या आचाऱ्याला अखेर दिंडोशी पोलिसांनी अटक केली. छोटे बहकू मुखिया असे त्याचे नाव असून तो व्यावसायिकाच्या घरी आचारी म्हणून काम करत होता. मुखिया हा मूळचा बिहारचा रहिवासी आहे. चोरीनंतर तो दिल्लीला पळून गेला होता. त्याला दिल्लीच्या लाजपत नगर येथून ताब्यात घेऊन अटक केली. कसून चौकशी केल्यावर त्याने गुह्याची कबुली दिली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.