पंजाब नॅशनल बँकेचा कर्जदारांना दिलासा

भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो रेटमध्ये 0.50 टक्के कपात करण्याची घोषणा केल्यानंतर पंजाब नॅशनल बँकेने कर्जाच्या व्याज दरात 0.50 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या या निर्णयामुळे होम लोन, कार लोन घेणाऱ्या कर्जदारांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. बँकेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून कर्जाच्या व्याजदरात कपात केल्याचे सांगितले. बँकेच्या या निर्णयामुळे ईएमआय स्वस्त होणार आहे. बँकेचा होम लोन आता 7.45 टक्क्यांपासून सुरू होईल. तर ऑटो लोन 7.9 टक्क्यांपासून सुरू होईल.