
आठवडाभरात सोने आणि चांदीची चमक चांगलीच चमकली आहे. सराफा बाजाराने दिलेल्या माहितीनुसार, आठवडाभरात चांदी प्रति किलोमागे 7 हजार 827 रुपयांनी वाढली आहे, तर सोन्याच्या किमतीत आठवडाभरात 1 हजार 790 रुपयांनी वाढले आहे. 31 मे रोजी सोने 95,355 रुपये होते, परंतु सोने प्रति तोळा 97,145 रुपये झाले आहे, तर चांदी मागील शनिवारी 97 हजार 458 रुपये प्रति किलो होती ती आता एक लाख 5 हजारांपर्यंत पोहोचली आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 97,970 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 89,800 रुपये आहे.