
एचडीएफसी बँकेची यूपीआय सर्व्हिस उद्या रविवारी चार तास बंद राहणार आहे. बँकेची सिस्टम मेंटनेंस आणि अपग्रेड करण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला आहे. 8 जून रोजी मध्यरात्री 2.30 वाजेपासून सकाळी 6.30 वाजेपर्यंत यूपीआय सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. या चार तासांत ग्राहक यूपीआय वरून कोणत्याही प्रकारची देवाण-घेवाण करू शकणार नाहीत. यूपीआयसह एचडीएफसी मोबाईल बँकिंग अॅप, रुपे क्रेडिट कार्ड, मर्चंड यूपीआय सह अन्य सेवा हाताळताना ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो, असे बँकेने स्पष्ट केले आहे.