मालवणच्या राजकोट किल्ल्यावर भव्य आरमार संग्रहालय

सिंधुदुर्ग जिह्याच्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 83 फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे. त्याच परिसरात शिवरायांच्या आरमाराची यशोगाथा सांगणारे भव्य संग्रहालय, प्रदर्शन आणि पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंबंधीच्या प्रस्तावाचा अभ्यास करून पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश शासनाने दिले आहेत. या प्रकल्पासाठीची जागा खासगी व्यक्तींकडून अधिग्रहीत करण्याची कार्यवाही चर्चेतून, सामोपचाराने पूर्ण करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.