मध्य रेल्वे 80 आषाढी विशेष ट्रेन चालवणार

पंढरपुरातील आषाढी वारीला जाणाऱया भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे 1 जुलै ते 10 जुलै या कालावधीत पंढरपूर व मिरजसाठी 80 आषाढी विशेष ट्रेनच्या सेवा चालवणार आहे. नागपूर-मिरज विशेष गाडय़ा (4 सेवा), नवीन अमरावती-पंढरपूर विशेष (4 सेवा), खामगाव-पंढरपूर विशेष (4 सेवा), भुसावळ-पंढरपूर अनारक्षित विशेष (2 सेवा), लातूर-पंढरपूर अनारक्षित विशेष गाडय़ा (10 सेवा), मिरज-कलबुर्गी अनारक्षित विशेष गाडय़ा (20 सेवा), कोल्हापूर-कुर्डुवाडी अनारक्षित विशेष गाडय़ा (20 सेवा), पुणे-मिरज अनारक्षित विशेष गाडय़ा (16 सेवा) चालवण्यात येणार आहेत. या आषाढी विशेष ट्रेनचे आरक्षण विशेष शुल्कासह 16 जून रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.