
ख्यातनाम गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. माणिक वर्मा फाऊंडेशनतर्फे ‘माणिक स्वर शताब्दी’च्या निमित्ताने ‘घननिळा’ ही सुरेल मैफल 13 जून रोजी सादर होईल. यामध्ये स्वरगंधर्व सुधीर फडके आणि माणिक वर्मा यांची सुमधुर गीते सादर होतील.
अनुजा क्रिएशन्स निर्मित, हेमेंद्र गोगटे सादर मैफल रात्री 8 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदिर,दादर येथे होईल. यामध्ये संगीतकार-गायक मंदार आपटे, गायिका केतकी भावे-जोशी आणि स्वरा जोशी सहभागी होतील. संगीत संयोजन आणि बासरी – प्रणव हरिदास, व्हायोलीन-महेश खानोलकर, तबला – अमेय ठाकुरदेसाई, कीबोर्ड- दीप वझे, गिटार – प्रेषित जैन, पखवाज/ढोलकी- सौरभ शिर्पे, ऑक्टोपॅड – हर्ष परमार, ध्वनी व्यवस्था – विराज भोसले यांची आहे. कार्यक्रमाचे निवेदन अनघा मोडक करतील. अधिक माहितीसाठी संपर्क 9892198710.