बद्धकोष्ठता, गॅस या समस्यांनी त्रस्त असाल तर, नाभीमध्ये तेल घाला! वाचा सविस्तर

आयुर्वेदात नाभी म्हणजेच बेंबी शरीराचे सर्वात शक्तिशाली केंद्र मानले जाते. आयुर्वेदानुसार नाभी हा आपल्या शरीरातील एक असा बिंदू आहे, जो शरीरातील 72,000 नसांशी जोडलेला असतो. त्याचबरोबर आयुर्वेदात नाभीत तेल लावणे देखील खूप फायदेशीर मानले जाते. याला ‘नाभी पुराण’ किंवा ‘पेचोटी पद्धत’ असे म्हणतात. असे मानले जाते की नाभीमध्ये तेल लावल्याने अनेक प्रकारच्या समस्या नैसर्गिक पद्धतीने दूर होतात. ही सोपी पद्धत तुमच्या संपूर्ण शरीरावर परिणाम करते. विशेषतः जर तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या जसे की बद्धकोष्ठता, गॅस इत्यादी असतील तर नाभीत तेल लावणे हा तुमच्यासाठी एक प्रभावी उपाय असू शकतो. यासाठी योग्य तेल निवडणे महत्वाचे आहे.

नाभीत कोणते तेल घालावे?

पोटाशी संबंधित समस्यांसाठी
पोट फुगणे, गॅस किंवा बद्धकोष्ठता यासारख्या पोटाशी संबंधित समस्या असतील तर नाभीत एरंडेल तेल लावणे खूप फायदेशीर ठरू शकते. हे तेल नैसर्गिकरित्या पचनक्रिया सक्रिय करते, आतड्यांना वंगण घालते आणि आतड्यांची हालचाल सुलभ करते.

हार्मोनल बॅलन्ससाठी
हार्मोनल बॅलन्ससाठी, पोषणतज्ञ नाभीमध्ये तिळाचे तेल लावण्याची शिफारस करतात. विशेषतः मासिक पाळीच्या काळात महिलांसाठी हे सर्वात फायदेशीर मानले जाते.

मुरुमांसाठी
चेहऱ्यावर मुरुमे-पिंपल्स असल्यास नाभीत कडुलिंबाचे तेल लावावे.

कोरड्या त्वचेसाठी
त्वचा खूप कोरडी आणि निर्जीव दिसत असेल तर तुमच्या नाभीत नारळाचे तेल लावणे फायदेशीर ठरेल. हे कोरड्या त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास मदत करते.

 

Skin Care – त्वचा उजळ होण्यासाठी चेहऱ्यावर कच्चे दूध लावताना, हा एक पदार्थ मिसळा! वाचा

चमकदार त्वचेसाठी
बदामाचे तेल त्वचा चमकदार आणि मऊ मुलायम करण्यासाठी फायदेशीर आहे.

सांधेदुखीसाठी
सांधेदुखीपासून आराम मिळविण्यासाठी नाभीमध्ये मोहरीचे तेल घालण्याची शिफारस करतात. यामुळे सांधेदुखी आणि कडकपणापासून आराम मिळतो.

नाभीत तेल कसे लावायचे?
रात्री झोपण्यापूर्वी, तुमच्या नाभीत 2-3 थेंब तेल टाका.
यानंतर, हातांनी हलक्या गोलाकार हालचालींनी मालिश करा आणि नंतर आरामात झोपा.
सकाळी उठल्यावर तुमचे पोट हलके आणि आरामदायी वाटेल.