
भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर बँका आता व्याजदर कमी करत आहेत. आरबीआयच्या निर्णयानंतर एसबीआयने आपल्या कर्जामध्ये 0.50 टक्क्यांनी कपात केली आहे. या कपातीनंतर एसबीआयचे सर्व कर्ज स्वस्त झाले आहे. त्यामुळे एसबीआयचा गृहकर्जाचा व्याजदर 7.50 टक्क्यांपासून सुरू होईल. एसबीआयच्या कर्जदाराने 20 वर्षांसाठी जर कर्ज घेतले असेल तर आधीचा व्याजदर 8 टक्के होता. त्यामुळे ईएमआय 16,721 रुपये येत होता, परंतु बँकेच्या कपातीनंतर व्याजदर 7.50 टक्क्यांवर आला असून ईएमआय 16,112 रुपये म्हणजेच 617 रुपयांनी हप्ता कमी झाला आहे. ज्यांनी आधीच कर्ज रेपो लिंक्ड लेंडिंग रेटशी जोडलेले फ्लोटिंग रेट होम लोन घेतले असेल त्यांचा व्याजदर पुढील रीसेट कालावधीत कमी होईल. यामुळे त्यांचा ईएमआय कमी होईल किंवा कर्जाचा कालावधी कमी होईल. जर कर्ज निश्चित दराशी जोडलेले असेल तर त्याचा फायदा मिळणार नाही.
युनियन बँक 7.35 टक्के
एसबीआय बँक 7.50 टक्के
पंजाब नॅशनल बँक 7.50 टक्के
बँक ऑफ बडोदा 7.50 टक्के
बँक ऑफ इंडिया 7.85 टक्के