चाहता थेट तलवार घेऊन पोचला मंचावर

कन्नड भाषेबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे कमल हासन यांच्या मंचावर चाहता तलवार घेऊन पोचला. त्याने जबरस्तीने कमल हासन यांच्या हातात तलवार द्यायचा प्रयत्न केला. कमल हासन हात सोडवत होते. पण चाहता ऐकत नव्हता. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हा प्रसंग बघून पोलिस कमल हासन यांच्या मदतीसाठी सरसावले. चाहत्यांची जबरदस्ती पाहून कमल हासन यांनी आपल्या टीमला बेपर्वाईबद्दल फटकारले आणि त्यांनी त्या फॅनला मंचावरून खाली उतरायला लावले. त्यांनी हात मिळवून त्याला जायला सांगितले.