
मेटाने अरुण श्रीनिवास यांच्याकडे हिंदुस्थानात व्यवस्थापकीय संचालक आणि बिझनेस हेडपदाची जबाबदारी सोपवली आहे. ते यापुढे हिंदुस्थानातील मेटाचे सर्व बिझनेस ऑपरेशन्स आणि स्ट्रटेजी ठरवतील. 1 जुलै 2025 पासून ते पदाचा कार्यभार सांभाळतील. अरुण श्रीनिवास हे मेटामध्ये जाहिरात व्यापारचे संचालक आणि प्रमुख म्हणून काम पाहत होते. ते 2020 पासून मेटात काम करत आहेत. श्रीनिवास यांना सेल्स अँड मार्पेटिंग क्षेत्राचा जवळपास 30 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी याआधी हिंदुस्थान युनिलिव्हर, रीबॉक, ओला कंपन्यांमध्ये वरिष्ठ पातळीवर काम केले आहे.