
एल्केम फार्मास्युटिकल कंपनीचे मालक संप्रदा सिंह यांचा मोठा मुलगा बिझनेसमॅन नवल किशोर सिंह यांनी महागडी कार रोल्स रॉयस खरेदी केली आहे. या कारची किंमत तब्बल 12.25 कोटी रुपये आहे. ही कार गेल्यावर्षी लाँच करण्यात आली होती. रोल्स रॉयसची ब्लॅक बॅज कलिननमध्ये 6.75 लिटर टर्बोचार्ज्ड व्ही 12 इंजिन आहे. या कारला 600 बीएचपीची पॉवर मिळते. तसेच 900 एनएमचे टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये 23 इंचांचे व्हिल्स दिले आहेत. ज्यात नवीन 7 स्पोर व्हील डिझाइन दिले आहे. कारच्या सर्व चाकाला आरआर लोगो लावलेला आहे.